*शेवटी अंतर तेवढचं राहीलं !* Best merathi poem.

 *शेवटी अंतर तेवढचं राहीलं !*

😌😌😌😌😌😌😌

लहानपणी, लोकांना हॉटेलमध्ये खाताना बघितले की खूप वाटायचं... आपण ही खावं..., ती श्रीमंत माणसं म्हणून पैसे खर्च करून खाऊ शकतात, आपण नाहीं... 


मोठा झाल्यावर हॉटेलचं खायला लागलो, तर आरोग्याच्या काळजीनं लोकं घरचा डबा खाताना दिसू लागली...


*शेवटी अंतर तेवढच राहीलं!*

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

लहानपणी गरिबीमुळे मी सुती कपडे घालायचो, तेव्हा लोक टेरिकॉट, पॉलीस्टरचे कपडे घालायचे, खूप वाटायचं आपणही असे घालावे...

मोठेपणी टेरिकॉट घालायला लागलो तर लोकं सुती वापरायला लागले... सुती कपडे महाग झाले.


*शेवटी अंतर तेवढच राह्यलं!*

🦢🦢🦢🦢🦢🦢🦢

लहानपणी खेळताना पडलो तर गुडघ्यावर पँट फाटायची,... शिवलेलं कोणाला दिसू नये म्हणून धडपड असायची... 

मोठेपणी लोकांना फाटलेल्या जिन्स दामदुपटीने घेताना बघितले...


*शेवटी अंतर तेवढच राह्यलं!*

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

लहान होतो तेव्हा दूध नसल्यानं घरी गुळाचा, काळा चहा मिळायचा... अन् लोकांना साखरेचा पितांना बघायचो... वाटायचं आपणही प्यावा पण ?


आता मी साखरेचा प्यायला लागलो तर लोकं गुळाचा ब्लॅक टी पिताहेत.


*शेवटी अंतर तेवढच राह्यलं!*

⭐⭐⭐⭐⭐⭐⭐

लहानपणी सायकल दामटायचो तेंव्हा लोक दुचाकी चार चाकी मधून फिरताना बघायचो, वाटायचं, आपणही फिरावं, आता सकाळी सकाळी सर्वांना सायकल वरून व्यायाम करताना बघितले की वाटत...


*शेवटी अंतर तेवढंच राहीलं!*

🌴🌴🌴🌴🌴🌴🌴

लहानपणी जेंव्हा चपाती मिळत नसल्यानं ज्वारी बाजरीची भाकरी खायचो तेंव्हा लोकं पोळी, चपाती भात खाताना आपणही खावं असं वाटायचं... 

आज तीच लोकं भाकरी खाण्यासाठी हॉटेल मध्ये पैसे मोजून रांगा लावल्या 


*शेवटी अंतर तेवढंच राहीलं!*

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

लहानपणी चाळीत राहायचो तेंव्हा बंगल्यात राहण्याऱ्याकडे बघून वाटायचं आपणही मोठ्या घरात राहावं, आज तीच मनशांती साठी दूर खेड्यात जंगलात जाऊन झोपडीत (रिसॉर्ट) मध्ये राहतात तेंव्हा 


*शेवटी अंतर तेवढंच राहीलं!*

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

_आता कळलं...हे अंतर असंच कायम राहणार, मग मनाशी पक्क केलं जसा आहे, तसाच राहाणार... कुणाचं पाहून बदलणार नाही..._


म्हणून तर *जगद्गुरु तुकोबारायांनी* म्हंटले होते ,


*_ठेविले अनंते तैसेचि राहावे,_*

*_चित्ती असू द्यावे समाधान ..._*

🌻🌼🌻🌼🌻🌼🌻

मित्रांनो खूश रहा, *समाधानी राहा,* लाइफ छान आहे, ती एन्जॉय करा ...!!!

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

*_कुणाचं पाहून आपल्या स्व-आनंदाची व्याख्या बदलवू नका._*✍️

*---वास्तव---*


एक माणुस

Post a Comment

0 Comments